अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक 423 शेतकर्यांना 2 कोटी 20 लाख 3 हजार 940 रुपये तर 22 संत्रा उत्पादक शेतकर्यांना 1 लाख 99 हजार 45 रुपये व 5 आंबा उत्पादक शेतकर्यांना 80 हजार 45 रुपये हवामानावर आधारित पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान सन 2019-2020 या आर्थिक वर्षात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील फळबागांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यातच हा पीकविमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लाभला आहे.
पारनेरच्या शेकडो फळबाग उत्पादक शेतकर्यांनी ग्रीनकल्चर विमा कंपनीच्या माध्यमातून हवामानावर आधारित हा फळबाग पीकविमा उतरविला होता. अतिवृष्टीमुळे व हवामान बदलामुळे डाळिंब उत्पादक, आंबा उत्पादक व संत्रा उत्पादक या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
या फळबाग उत्पादक शेतकर्यांना हा पीकविमा मिळाला पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे व कंपनी प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधून व पाठपुरावा करून ही मदत या शेतकर्यांना मिळवून दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved