पीक विमा योजनेची मुदत ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा वाढवली, अहमदनगरमधील विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा पाहून चकित व्हाल

शेतकऱ्यांसाठी शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. आता या शेतकऱ्यांसाठी एक ओठी अपडेट आली आहे.

Pragati
Published:
krushi

शेतकऱ्यांसाठी शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. आता या शेतकऱ्यांसाठी एक ओठी अपडेट आली आहे.

अनेक शेतकऱ्यांना विविध कारणामुळे पीकविमा काढता आला नव्हता. त्यामुळे आता शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ६९८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला आहे.

शेतकरी अर्ज संख्या ९ लाख ३० हजार ८८८ असून ९ लाख १९ हजार ४५४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

पीक विमा का दिला जातो?
शेतकरी अगदी कष्टाने शेती पिकवतो, मेहनत करतो परंतु बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे,

पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, नावीन्यपूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे आदी हेतू साध्य करण्याच्या हेतूने ही पीक विमा योजना राबविली जात आहे.

९ लाख हेक्टरचा काढला विमा
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ९ लाख १९ हजार ४५४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. येत्या काही दिवसात आणखी क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान आता, ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढविली आहे.

शेवटच्या काही दिवसात अनेक जण अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी सर्व्हर डाऊनसारखे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच पीक विमा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News