अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- कोपरगांव विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज असून शेतकरी बांधवांना पिकांना पाणी देण्यासाठी सध्या पाण्याची अडचण भासत असल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे आहे.
त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी मिळावे अशी मागणी मा.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
यावेळी कोल्हे म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत वेळेत पाणी नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेचा लपंडाव सुरू आहे .
शिवाय आधीच जगासह संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीने थौमान घातलेले असल्यामुळे हातात असलेली पिके ही योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे
खरीप वाया गेला कशीबशी रब्बी हंगामाची पिके उभी केलेली असून त्यातच पाणी उशिराने सोडल्यास पिके वाया जाणार आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांना तातडीने पाणी मिळणेकरीता गोदावरी कालव्यांना तात्काळ पाणी सोडावे.