अहमदनगर बातम्या

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात मुसळधार पावसामुळे पीकं पाण्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- राहाता तालुक्यात या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस झाला. रांजणगाव व परिसरात 118 मिमी पावसाची नोंद झाली. राहाता येथे 50 मिमी, शिर्डीला 35 मिमी, चितळी 85 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

यामुळे अनेक शेतात पाणी साठले. सोयाबीन तसेच इतर उभी पिके पाण्यात होती. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच धुव्वाधार पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट सुरु झाला.

मुसळधार पावसाची वर्दी देत पावसाला एक ते दीड तासात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. हा पाऊस अडीच ते तीन तास टिकून होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला.

मध्यम स्वरूपाचा पाऊस पहाटे चारपर्यंत टिकून होता. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने परिसर झोडपून काढला आहे.

दरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीस आली आहे. जोमदार आलेले सोयाबीनला चांगल्या शेंगा लगडल्या आहेत. या शेंगा पाण्यात बुडाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होऊ शकते.

त्यामुळे असे शेतकरी काळजीत आहेत. दरम्यान राहाता तालुक्यातील रांजणगावात तब्बल 118 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले.

अस्तगाव, रांजणगाव भागात जोरदार पाऊस झाल्याने हे पाणी एकरूखे भागात वाहून गेल्याने तेथील तळे तुडूंब भरले. या पावसाने विहिरी, इंधन विहिरींना पाणी वाढू शकेल.

त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही भागातील बंधारे तुडूंब झाल्याने जलसंपदा विभागवर ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यावर फार ताण येणार नाही.

Ahmednagarlive24 Office