अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी कोट्यवधींचा निधी, ‘या’ गावांमध्ये होणार बंधारे, आ. निलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पारनेर नगर मतदार संघातील विविध गावांमध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून १२ कोटी ८५ लाख ५६ हजार ७०३ रूपयांच्या खर्चाच्या योजनांना प्रशासकिय मान्यता देण्यात अली आहे.

अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वीही याच महिन्यात ११ गावांत कोल्हापूर पध्दतीसह बंधारे बांधण्यासाठी १२ कोटी ९२ लाख १६ हजार ४६८ रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

या गावांमध्ये होणार बंधारे

पारनेर तालुक्यातील वाळवणे, काळयाची खोरी १ कोटी ४८ लाख, ७ हजार ७२२, रूईछत्रपती १ कोटी २१ लाख ८ हजार, ७७९, पारनेर पुजारी मळा १ कोटी ३० लाख १ हजार ७१८, कोहकडी, खंडेकर मळा १ कोटी ३७ लाख २० हजार ४५७, वडनेर बुद्रुक १ कोटी ६० लाख ६५ हजार ६०४,

नगर तालुक्यातील आरणगांव बाबुर्डी घुमट रोड १ कोटी ४ लाख ५५ हजार २६, खडकी माउलाई १ कोटी २८ लाख ९ हजार ९९८, देउळगांव सिध्दी ता. नगर टेकाडे वस्ती ९६ लाख ६० हजार ८३,भोयरे खुर्द ता. नगर पानमंद वस्ती ८८ लाख ८५ हजार ८८४,

नगर तालुक्यातील सोनेवाडी येथे देवकर पाटील वस्ती ८८ लाख १४ हजार ३५१, ठुबे मळा ८१ लाख ३७ हजार ८४ रुपये असे कामे होणार आहेत.

जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीसाठी शाश्वत पाणी

आ. लंके म्हणाले, पर्जन्यछायेमध्ये येणाऱ्या पारनेर-नगर मतदारसंघात विविध जलसंधारणाच्या योजना राबवून शेतीसाठी शास्वत पाणी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आजवर मतदारसंघात अनेक बंधारे बांधण्यात आले असून जलसंधारणाच्या कामे जास्तीत जास्त राबविण्यावर आपला भर आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office