अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २८५ रुग्ण आढळून आले. बळींची एकूण संख्या ८५३, तर बाधितांची संख्या ५५ हजार ६३५ झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी ३४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार २४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे. बुधवारी रुग्णसंख्येत २८५ ने वाढ झाली.
उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४९१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५२, खासगी प्रयोगशाळेत ८४ आणि अँटीजेन चाचणीत १४९ बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयात मनपा २३, जामखेड २, नगर ग्रामीण ७, नेवासे ३, पारनेर २, पाथर्डी २, राहाता १, राहुरी ५, संगमनेर १, शेवगाव १,
श्रीगोंदे २, कॅन्टोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल १, इतर जिल्हा १ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, बाजारात गर्दी वाढली असून अनेकजण मास्क वापरत नसल्याने प्रादुर्भाव वाढणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved