बापरे ! महिलेचे कपडे फाडले १५ जनांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : बहिणीच्या मुलीस पोलिसांच्या मदतीने एकाच्या ताब्यातून सोडवत तिला स्नेहालयात पाठविल्याचा राग मनात धरुन या महिलेस १० ते १५ लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करत, संगनमताने लाकडी दांडक्याने मारहाण केली.

तसेच या दरम्यान लज्जास्पद वर्तणूक करीत अंगावरील कपडे फाडले. याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपोंविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुऱ्हा नोंदविण्यात आला आहे.

ही घटना श्रीरामपूर शहरातील गोपीनाथनगरमध्ये घडली. ही घटना ५ मे २०२० रोजी घडली. महिलेने घटनेबाबत शहर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र तिची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24