अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने चिंता वाढली आहे.
रविवारी दिवसभरात ४१ जण पॉझिटिव्ह आढळून आले त्यापैकी २२ रुग्ण संगमनेर तालुक्यातील एकट्या कुरण गावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी दिवसभरात नगर शहरातील सावेडी भागातील १, नवनागापूर येथील तीन, नगर शहरातील पद्मानगर भागातील दोन, नाईकवाडपुरा (संगमनेर) येथील एक, श्रीरामपूर येथील एक, भिंगारमधील गवळीवाड्यातील दोन,
खेरडा (ता. पाथर्डी) येथील दोन, राहाता येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच कुरण गावातील २२ जण, शेवगाव तालुक्यातील निंबे नांदुर येथील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावचे पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews