अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : ट्रकमध्ये डिझेल आणण्यासाठी ज्यांना मदत केली, त्यांनी चक्क त्याच तरूणाला लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी शहरातील नेप्ती नाका चौकात घडली. याबाबत राजेंद्र मदन राम यांनी फिर्याद दिली आहे.
राम हे शुक्रवारी नेप्ती चौकात उभे होते यावेळी अनोळखी ५ व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. “आपच्या ट्रकपधील डिझेल संपले आहे, ते आणण्यासाठी मदत करा,’ असे या व्यक्तींनी राम यांना सांगितले.
त्यावर राम त्यांनी त्यांना मदत केली. परंतु नंतर मात्र यातीलच एकाने राम यांच्या ‘पोटात चाकू लावून इतर चौघांनी राम यांच्याजवळील १० हजार रूपयांच्या कपड्याची बॅग, मोबाईल व १५ हजार रूपये रोख असा ऐवज काढून घेतला.
तसेच दुचाकीचेही नुकसान केले. त्यानंतर हे आरोपी (एमएच १६ एवाय ९६६५) या ट्रकमधून कामरणावच्या दिशेने पळून गेले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews