घरगुती पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा महिलांनी फोडली दहीहंडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी रात्री घरगुती पध्दतीने दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला.

लोंढे निवासमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महिला व युवक फिजीकल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावून सहभागी झाले होते. महिलांच्या हस्ते दही हंडी फोडण्यात आली.

तर दही हंडी फोडणार्‍या महिलेस पैठणी साडीचे बक्षिस देण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व सण, उत्सवांवर गदा आली आहे.

श्रीकृष्ण जन्माचे प्रतिक म्हणून साजरी होणार्‍या दही हंडीचा (गोपाळकाला) आनंद घरगुती पध्दतीने लुटता यावा यासाठी पै.संभाजी लोंढे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी रंजना रणनवरे, श्रावणी सुपेकर, ज्योती सुपेकर, मिरा साठे, पुष्पा केळगंद्रे, पूजा परळकर, अनिकेत साठे, शुभम रणनवरे, गौतम लसगरे, जय लसगरे, संजय निशाद, कमल निशाद, दिपक काळे, किरण जरे गोविंद शिंदे आदि उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24