अहमदनगर बातम्या

दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान: नगर जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मिळणार २६ कोटी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar news : मागील दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये जिल्ह्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यात सतत पडणाऱ्या पावसाने जोमात आलेल्या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.

त्यावेळी या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली होती. मात्र सरकारने २०२२ च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे मात्र अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेतिपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त २५ कोटी ९७ लाख ८९ हजार रुपयांचा लाभ होणार आहे.या नुकसानीपोटी २० जून २०२३ रोजी नगर जिल्ह्यासाठी २४१ कोटी १ लाख ४३ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

सन २०२२ च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे परंतु अतिवृष्टीच्या निकषाबाहेर झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण १५०० कोटी इतका निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली होती.

मात्र हि मदत व नुकसान यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यानंतर ज्या जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जादा निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक गणनेच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती प्रथमतः डिचीटी प्रणालीवर उशिरात उशिरा २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत भरून घ्यावी. त्यानंतर सुधारित मंजूर निधीपेक्षा नेमक्या किती जादा निधीची आवश्यकता आहे.

याबाबतची माहिती नोंदवावी अशा सूचना पत्राव्दारे सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या. या पत्रान्वये पुन्हा ज्यादा निधीच्या मागणीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुषंगाने अहमदनगरच्या जिल्हाधिकारीयांच्याकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधीच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. हा निधी वितरणास मंजुरी देण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office