अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील रतडगाव येथील दत्तु मोहिते यांनी रतडगाव ग्रामपंचायतीमधील गैर कारभार झाल्याविषयी माहिती अधिकारात माहिती मागविल्याने त्यांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तु मोहिते यांनी रतडगाव येथील माजी सरपंच तुकाराम बाबु वाघुले यांच्या विरोधातील माहिती मागविली आहे.
मोहिते यांच्या अर्जानुसार रतडगाव येथे अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे म्हंटले आहे. यावरुन सत्यता बाहेर येवू नये म्हणून त्याना वारंवार धमक्या दिल्या जात असल्याने त्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे,
यातुन त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने दखल घेण्यात यावी व पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी मोहिते यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, माझ्या जिवाचे अथवा कुटुंबाचे जिवाचे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी वरील व्यक्ती जबाबदार राहिल.