अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातील गणेशवाडी रोड येथे राहणारी शेतकरी महिला सौ. मीराबाई दत्तात्रय दरंदले, वय ५० व त्यांचे पती दत्तात्रय निवृत्ती दरंदले यांना चौघा आरोपींनी संगनमत करुन शेतातील रस्त्यावरुन जाण्या- येण्याच्या कारणातून काठीने हातावर, पायावर, मांडीवर मारून शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारुन जिवे मारण्याची धमकी दिली.
दोघे पती-पत्नी जखमी झाले असून मीराबाई दतात्रय दरंदले या महिलेच्या फिर्यादीवरून मारहाण करणारे आरोपी भाऊबंद बंडू नामदेव दरंदले, सुवर्णा बंडू दरंदले, संध्या अरुण उर्फ भाऊराव दरंदले, अरूण उर्फ भाऊराव दरंदले,
सर्व रा. गणेशवाडी, सोनई यांच्याविरुद्ध सोनई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सपोनि करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना फलके हे पुढील सपास करीत आहेत.