अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- चोरटे, भामटे अंधाराचा फायदा घेत चोऱ्या करतात व याच काळभोर अंधारात फरार होतात. हे तर आपल्याला माहीतच आहे.
मात्र जिल्ह्यातील कर्जत येथील सबजेलचा सभोवतालचा परिसर हा देखील विजेविना काळोखाच्या विळख्यात सापडला आहे. फेब्रुवारी महिन्यात याच अंधाराचा फायदा घेत अट्टल गुन्ह्यातील पाच आरोपींनी पलायन केले होते.
तरी सुद्धा प्रशासन गाफील राहते हे विशेष. कर्जत येथील जुने तहसील कार्यालय आणि जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत सध्या फक्त उपकारागृह उरले आहे. येथील बाकी सर्व कार्यालयांचे नवीन जागेत स्थलांतर झालेले आहे.
मात्र रात्री या उपकारागृहाच्या आवारात फक्त ‘अंधाराचे साम्राज्य’ दिसत असून येथील पोलीस कर्मचार्यांना जीव मुठीत घेऊन आपले कर्तव्य बाजवावे लागत आहे.
उपकारागृहाच्या मागे बंद आणि दुरावस्था झालेली पोलीस वसाहत आहे. तसेच सभोवताली झाड झुडपे आहेत. रात्री उपकारागृहात विजेच्या दिव्यां व्यतिरीक्त परिसरात सर्वत्र अंधारच अंधार पसरतो.
रात्री अपरात्री उपकारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत कारागृह प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याचे दिसून येते.
सध्या सबजेलमध्ये 40 ते 45 आरोपी आहेत. परंतु येथे रोज चार पोलीस कर्मचारी पहारा देतात. परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असल्याने उपकारागृहाच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved