Ahilyanagar News:- कोळपेवाडी तसेच कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून गोदावरी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांच्या मधून रब्बी हंगाम 2024-25 करिता सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता शेतकऱ्यांना पाच डिसेंबर पर्यंत याकरिता अर्ज करता येणार आहे.
त्यामुळे अजूनपर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज ज्या शेतकऱ्यांनी दाखल केला नसेल अशा लाभधारक शेतकऱ्यांनी 5 डिसेंबर पर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावेत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. पाणी मागणी अर्ज दाखल करण्याला आता मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना नक्कीच यामुळे दिलासा मिळणार आहे.
हा अर्ज दाखल करण्याची मुदत आधीच संपलेली होती व अनेक शेतकऱ्यांनी या कालावधीत पाणी मागणी अर्ज दाखल केलेला न होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा सूचना केल्या होत्या व यानुसार आता पाटबंधारे विभागाने 5 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पाणी मागणी अर्ज दाखल करायला मिळाली पाच डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोदावरी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम 2024-25 करिता सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या सूचनेवरून लाभधारक शेतकऱ्यांना आता पाच डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे अजून पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज दाखल केला नसेल अशा उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करण्याचे आवाहन आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
रब्बी हंगाम 2024-25 करिता गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात येऊन रब्बी हंगामातील पिकांकरिता पाटबंधारे विभागाकडून डाव्या उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे.
त्यानुसार 14 नोव्हेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज भरणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते. परंतु ही मुदत संपल्यानंतर देखील बरेच लाभधारक शेतकरी मात्र अर्ज दाखल करू शकले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होऊ नये याकरिता आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्याकरिता मुदत वाढ द्यावी
अशा सूचना केलेल्या होत्या व त्यानुसार आता पाटबंधारे विभागाकडून पाच डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे व त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील पाणी मागणी अर्ज दाखल केला नसेल अशा शेतकऱ्यांनी तातडीने संबंधित विभागाकडे अर्ज दाखल करावेत असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.