Ahmednagar News : विजेचा धक्का बसल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील बाळगव्हाण येथे घडली. शुभम गोकुळ दाताळ (वय २४), असे मयत तरुणाचे नाव आहे.
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील पोल्ट्री व्यावसायिक शुभम गोकुळ दाताळ याचा विजेच्या मुख्य वाहिनीला झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील गोकुळ दाताळ हे या घटनेत जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे खर्डा व बाळगव्हाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान यातील मयत तरुण शुभम गोकुळ दाताळ व त्याचे वडील
स्वतःच्या पोल्ट्री फार्मच्या शेडजवळील लाईटचा सप्लाय बंद असल्याने तो चालू करण्यासाठी ते गेले असता त्यांना मोठा झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या जवळ उभे असणाऱ्या त्यांच्या वडिलांना करंट बसून ते बाजूला फेकल्याने ते जखमी झाले.
शुभम दाताळ यांचा स्वभाव शांत, मनमिळावू व प्रेमळ होता. ते अविवाहित होते. शुभम दाताळ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे जामखेड तालुक्यासह खर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे आई-वडील, आजी, एक भाऊ असा परिवार आहे.