Ahmednagar News : महिलेसह मुलाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखलची मागणी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्यातील तिसगाव येथील महिलेने नऊ वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी (दि. ९) घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पतीसह सासरच्या पाच लोकांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषा संदीप नरवडे (वय ३५) व ओंकार संदीप नरवडे (वय ९) दोघेही राहणार तिसगाव, ता. पाथर्डी अशी मृतांची नावे आहेत.

या प्रकरणी संदीप लक्ष्मण नरवडे ( पती), मीरा लक्ष्मण नरवडे (सासू). लक्ष्मण नरवडे (सासरा), विलास लक्ष्मण नरवडे (दीर) सर्व रा. तिसगाव, ता. पाथर्डी व संध्या माने (नणंद) रा. ढवळेवाडी, ता. पाथर्डी, हल्ली मुक्काम अहमदनगर यांच्या विरोधात मनीषा नरवडे यांचा भाऊ एकनाथ बाबासाहेब काटे (रा. नवीन दहिफळ, ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.

सासरच्या मंडळींनी मनीषा दरवडे हिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. वारंवार त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

या सर्व प्रकाराला वैतागून मनीषा दरवहे हिने मुलगा ओमकार याच्यासह त्यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असे एकनाथ काटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, ही मागणी महिलेच्या नातेवाइकांनी केली. दोन्ही मृतदेहांवर अंत्यविधी न करण्याचा पवित्रा मुलीकडच्या नातेवाइकांनी घेतल्याने काही काळ वातावरण चिघळले होते.

या प्रकरणी पोलिसांनी पती संदीप नरवडे याला अटक केली आहे. सायंकाळी उशिरा दोन्ही मृतदेहांवर तणावपूर्ण वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.