अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-वरखेड येथील दलित महिला पारूबाई सुंदर बनकर यांच्यावर झालेल्या अत्याचार विरोधात आंदोलन केले जाणार आहे.
तसेच जळके बु येथील फसवणूक प्रकरणी पोलिस कर्मचारी लाला बाबू पटेल व त्यांचे नातेवाईक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल होऊन बडतर्फे करण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे.
दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ नॅशनल पीपल्स पार्टीच्या वतीने २ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी महिला आघाडी सचिव मीनाबाई राहिंज, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ, कार्याध्यक्ष विश्वनाथ शिंदे, श्रीधर शेरे, हिराबाई शिरसाठ, विजय शिरसाठ आदी उपस्थित होते. २ रोजी प्रदेश उपाध्यक्ष कल्याणराव अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved