गाव पातळीवर शेतकरी संरक्षण कायदा सभांची स्थापना करण्याचा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- प्रत्येक राज्याला रेल्वे मंत्री मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने भारतीय घटनेतील परिशिष्ट 7 च्या केंद्रीय विषय

सूची क्र.22 रेल्वे हा विषय याच परिशिष्टातील सामाईक यादीमध्ये टाकण्याची मागणी करुन सत्यबोधी सुर्यनामा करण्यात आला.

तर शेतकरी संरक्षण कायदा लागू होण्यासाठी गाव पातळीवर शेतकरी संरक्षण कायदा सभांची स्थापना करण्याची घोषणा हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.

तसेच नगरच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वाची भूमिका घेणारे उद्योजक हरजितसिंह वधवा यांना रेल्वे लॉरिस्टरचा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, उषा निमसे, अंबिका नागूल, मनिषा राठोड, फरिदा शेख, शशीकला गायकवाड, लतिका पाडळे, छाया पाडळे, अशोक भोसले, पोपट भोसले, सखूबाई बोरगे आदि उपस्थित होते.

देशातील राज्यांमध्ये स्थानिक रेल्वेचे जाळे पसरुन औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या प्रगती साधण्यासाठी प्रत्येक राज्याला रेल्वे मंत्रीची नियुक्ती होणे आवश्यक आहे.

इंग्रजांनी तयार केलेल्या रेल्वेच्या जाळ्यात थोड्या फार प्रमाणात वाढ झाली आहे. सत्ता केंद्रीकरणामुळे पुरेश्याप्रमाणात रेल्वेचे जाळे संपुर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरु शकलेले नाही. यासाठी भारतीय घटनेतील परिशिष्ट 7 च्या केंद्रीय विषय सूची क्र.22 रेल्वे हा विषय याच परिशिष्टातील सामाईक यादीमध्ये टाकण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या तृप्ती देसाई यांना शक्तीकर्मा लॉरिस्टरचा सन्मान देण्यात आला. देशात शेतकरी संरक्षण कायदा आनण्याच्या दृष्टीने प्रत्येक गाव पातळीवर शेतकरी संरक्षण कायदा संभांची निर्मिती करण्याचा निर्णय या बैठकित झाला असून, या दृष्टीने संघटन केले जाणार आहे.

गाव पातळीवर कायदा सभापती व उपसभापती अशा पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. देशातील शेतकर्‍यांच्या उत्पदनांना चांगला हमीभाव मिळण्यासाठी व डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशीचा कायद्यात प्राधान्याने तरतूद करण्याची तसेच शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संरक्षण न्यायालयाची उभारणी करण्याची मागणीचा ठराव संघटनांच्या वतीने घेण्यात आला

. हरजितसिंह वधवा यांनी नगर-पुणे लोकल रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यासाठी आजी-माजी खासदार प्रयत्नशील असून, आपण देखील यासाठी प्रयत्न करणार असून, वेळप्रसंगी जनआंदोलन देखील उभे करण्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी नगर-पुणे लोकल रेल्वे सुरु झाल्यास नगर जिल्ह्याचा झपाट्याने विकास होणार आहे. अनेक बेरोजगार युवकांना पुण्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ही दोन्ही शहरे रेल्वेच्या माध्यमातून जवळ आल्याने व्यापार व उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.

देशाच्या विकासासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक आहे. मात्र शेतकर्‍यांना डावलून हा विकास शक्य नाही. यासाठी शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आनण्याची खर्‍या अर्थाने गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24