अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरी सरसकट ५० हजार शासनाने जमा करावेत; अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी दिला.
नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर रासपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बाचकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे पिके भुईसपाट झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
आंदोलनात राजेंद्र बेल्हेकर, कपिल लाटे, सुवर्णा जऱ्हाड, राजू भुसारी, नानासाहेब कोळपे, मालुजी तिखोले, ठकाजी बाचकर, भारत बाचकर, मिनीनाथ बाचकर, अशोक होडगर, मयूर वीरकर, तात्या बाचकर, अभिमन्यू बाचकर सहभागी झाले. निवेदन पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख व नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved