छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न ! आमदार जगताप म्हणाले लवकरच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- नगर शहराच्या विकासाची पायाभरणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्व युवकांना करायचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मुर्तीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र मध्ये ऐतिहासिक ठरला आहे. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभरतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होऊन

मोठ्या उत्साहात आज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला लवकरच राज्य शासनाकडे पाठपुरावा करून छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्तीची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे

तसेच शहरांमध्ये धर्मवीर संभाजीराजेचां पुतळा बसविण्यासाठी पाठपुरावा करणार याच बरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे

असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. अहमदनगर शहरात रविवारी (दि.६) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ.जगताप बोलत होते.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी यावेळी उपमहापौर गणेश भोसले, युवानेते अक्षय कर्डीले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.