मागणी 750 टनाची पुरवठा अवघा 70 टन;युरियाची तीव्र टंचाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- सध्या पाऊस वेळेवर आणि मुबलक झाल्याने बळीराजाची शेतीची लगबग सुरु आहे. यासाठी लागणारा रासायनिक खतांचा पुरवठा मात्र अपुरा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राहाता तालुक्यात युरिया खताची तिव्र टंचाई असून या खताची मागणी 750 टनाची आहे. मात्र पुरवठा अवघा 70 टनाचा झाला.

त्यामुळे युरिया खरेदीसाठी कृषी दुकानांसमोर शेतकर्‍यांच्या रांगा लागत असून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलावे लागत आहे.

राहाता बाजार समिती समोरील कोपरगाव शेतकरी संघाच्या दुकानात 15 टन युरीयाची विक्री सुरू झाल्याची माहीती मिळताच तेथे जत्रेचे स्वरूप काल पहायला मिळाले.

त्यासाठी रांगा लागल्या. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी चक्क पोलिसांना बोलवावे लागले. ज्यांचा वशिला त्यांनी अगोदरच खरेदी केली तर सर्वसामान्य शेतकरी रांगेत असतानाच युरिया संपली.

अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. असेच चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. या महिन्यासाठी राहाता तालुक्यासाठी 750 टन युरियाची मागणी केली होती.

मात्र अवघी 70 टन उपलब्धी झाली . ठिकठिकाणी होत असलेल्या लॉकडाऊनमुळे रॅक लागत नसल्याने युरिया मिळण्यास अडचणी येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24