अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अरणगाव (ता. नगर) येथील एक्सप्लोझीव नियमांचे उल्लंघन करुन बांधलेल्या स्फोटकांच्या गोडाऊनचा परवाना रद्द करावा व बेकायदा गोडाऊन पाडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना पोटे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगर तालुक्यातील अरणगाव मधील गट क्रमांक 368/1 आणि 368/2 या गटांमध्ये फटाक्यांचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. सदर गोडाऊन एक्सप्लोझीव नियमानुसार बांधण्यात आलेले नाही.
या गोडाऊनचे फायर ऑडिट व स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलेला नाही. तसेच हे गोडावून बांधताना नगररचना विभागाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.
सदरील गोडाऊन दुमजली बांधण्यात आलेले असून, ते एक्सप्लोझीव कायद्याला धरुन बांधण्यात आलेले नाही. एक्सप्लोझीवच्या नियमानुसार गोडाऊन दोन मजली बांधता येत नाही.
गोडाऊन बांधताना एक्सप्लोझीव नियमांचे पुर्णत: उल्लंघन करण्यात आले असल्याचे रंजना पोटे यांनी निवेदनात म्हंटले आहे. या प्रश्नी यापुर्वी देखील तक्रार करण्यात आलेली असून, त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
एक्सप्लोझीव नियमांचे उल्लंघन करुन बांधलेल्या स्फोटकांच्या गोडाऊनचा परवाना रद्द करावा व बेकायदा गोडाऊन त्वरीत पाडण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करुन उपोषण करण्याचा इशारा पोटे यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved