अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- हथरस येथील बलात्काराच्या घटनेनंतर पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले चार मुस्लिम युवकांना उत्तरप्रदेश सरकारने दंगल घडविण्याच्या खोट्या आरोपाखाली अटक केली आहे.
तातडीने चारही युवकांची सुटका करावी व बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याची मागणी करुन दलित तरुणीवर झालेल्या सामुदायिक बलात्कार घटनेचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी उत्तरप्रदेशच्या योगी सरकार विरोधात घोषणा दिल्या. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष जूबेर शेख, हुजेफा शेख, जिया शेख, खालीद शेख आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते. उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या
सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर सीएफआय या विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते सदर पीडित कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेले होते. सोबत एक पत्रकाराचा देखील समावेश आहे. त्यांना उत्तरप्रदेश सरकारने दंगल भडकावल्या प्रकरणी अटक केली आहे.
सदरील युवक पीएफआयचे कार्यकर्ते नसून, सीएफआय विद्यार्थी संघटनेचे आहे. यावरुन उत्तरप्रदेश सरकारने दरवेळीप्रमाणे पीएफआय संघटनेला टार्गेट केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अटक केलेल्या युवकांवरील खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी,
हाथरस बलात्कार प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी आदि विविध मागण्यांसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) वतीने फिजीकल डिस्टन्स व नियमाचे पालन करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved