अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर शहर मनपा हद्दीमध्ये मध्ये असलेल्या किराणा व भाजीपाला विक्रेते यांना 16 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 1 जून पर्यंत अतिरिक्त जाचक व अन्यायकारक निर्बंध लागू केल्याच्या निषेधार्थ मनपा आयुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन देताना शहर जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विलास गांधी समवेत अरुण पारख आदी उपस्थित होते.
कोरोणाच्या प्रादुर्भाव पाहता अहमदनगर जिल्ह्यात शहरापेक्षा तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे तरीही तालुक्यात राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व काही सुरळीत चालू आहे मग शहरासाठी असे कठोर व जाचक निर्बंध का? यांच्यामुळे सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांचे अतोनात हाल व नुकसान होत आहे.
राज्य सरकारच्या नियमात सांगितल्याप्रमाणे कोणतेही अतिरिक्त निर्बंध लावण्याच्या 48 तास अगोदर पूर्वसूचना देणे आवश्यक आहे तरीही आपण अशी कोणतीही पूर्वसूचना न देता एकाएकी ऐन वेळी सर्वसामान्य जनतेचा व व्यापार यांचा विचार न करता असा अन्याय कारक व पिळवणूक करणारा निर्णय घेतला अगोदर पंधरा दिवस हे कठोर निर्बंध असल्यामुळे किराणा व भाजीपाला बाजार बंद होते
त्यामुळे उघडल्यावर जनतेची थोडीफार गर्दी होणे सहाजिकच होते तरी या निर्णयाचा पूर्ण विचार करावा व संपूर्ण जिल्ह्यात समान निर्बंध लावण्याची मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.