उड्डान पुलाला बाबासाहेबांचे नांव देण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी योग्य जागा निश्‍चित करावी, शहरात होत असलेल्या उड्डान पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव द्यावे व टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जीवन पारधे, फिरोज पठाण, विवेक विधाते, पै. जग्गू गायकवाड, राहुल कांबळे, रवी भिंगारदिवे, अमर निर्भवणे, ऋषिकेश जाधव, आकाश जाधव, अतुल पाखरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा संदर्भात अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत शासन कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नसून, नेहमीच टाळाटाळ केली जात आहे. राजकारणा पुरते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन समाजाची दिशाभूल करण्याचे काम वेळोवेळी करण्यात आली आहे.

पूर्वी सक्कर चौक येथील जागा पूर्णाकृती पुतळ्यासाठी नियोजित केली होती. सदर जागा ही महानगरपालिकेची असून पालिका प्रशासन वेळोवेळी हेतुपुरस्सर पुतळ्या संदर्भात उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सर्वपक्षीय कमिटी संघटित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्‍चित करावी,

प्रस्तावित उड्डाणपुलास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण करून सामाजिक कार्यासाठी ते खुले करावे,

सदर ठिकाणी सुसज्ज वाचनालय सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागण्या पुर्ण होईपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करु नेय असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24