अहमदनगर बातम्या

नगर शहराच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे 350 कोटी रुपयांच्या निधीची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील रस्त्याची परिस्थिती सुधारविण्यासाठी सेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे ३५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली.

शहरातील उखडलेल्या रस्त्यांची समस्या खूप मोठी आहे. वर्षानुवर्षे नगरकर या समस्येबाबत नरकयातना भोगत आहेत. शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविणे खूपच अत्यावश्यक आहे.

यासाठी नगर शहरातील शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते.

माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे हे त्यांच्यासमवेत होते. नगर शहरातील रस्त्याची कामे निधी अभावी रखडलेली असून त्यासाठी ३५० कोटी रुपये इतक्या मोठ्या निधीची गरज आहे

ही मागणी त्यांच्याकडे नोंदविण्यात आलीये तेव्हा लवकरच शहरातील डी पी रस्त्यासाठी भरीव मोठा निधी दिलाजाईल असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे. 1 (1).jpeg नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता.

स्व . आ. अनिल भैय्या राठोड यांची जनतेशी घट्ट पकड होती. त्यांच्या विचार आणि कार्यावर आधारित काम करून नगर शहर शिवसेनेतील युवा सदस्यांची पक्ष वाढीस चालना द्यावी.

अशी सूचना शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी केली आहे. नगर महानगर पालिकेत आपली सत्ता आहे याद्वारे नगर शहराचा मोठा विकास करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे.

या संधीचे सोने करण्यासाठी सेनेतील युवा वर्गाने पुढाकार घ्यावा . जिथे कुठे अडचण येईल त्या ठिकाणी मी जातीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावेल. असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.

Ahmednagarlive24 Office