अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जबाबदार अधिकारी यांनी मस्तवालपणे आपल्या कर्तव्याचे पालन न करता
शहराला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा निषेध अ.भा. छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला. तर मनपा आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारीला तातडीने निलंबीत करण्याची
मागणी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी छावाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, आशा गायकवाड, सुमेता शेजुळ, सुरेखा साळी, विलास कराळे आदि उपस्थित होते.
बोल्हेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या घरात घुसून मद्य प्राशन करुन महापालिकेचे अरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ,
कर्मचारी बाळू घाटविसावे यांनी मारहाण करुन गच्ची वरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 13 जून रोजी घडली.
याबाबत पिडीत मुलाच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. सदर अधिकारी हे आरोपी असून, त्यांना जबाबदारीच्या पदावरुन तातडीने निलंबीत करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews