त्या मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबीत करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : गुन्हा दाखल झालेल्या मनपा आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारी यांना तातडीने निलंबीत करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली.

तर या गैरकृत्याचा निषेध नोंदवून सदर मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त (कर) संतोष लांडगे यांना देण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजिम राजे, मोहंमद हुसेन व पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेचे जबाबदार अधिकारींनी शहराला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. बोल्हेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या घरात घुसून मद्य प्राशन करुन महापालिकेचे अरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे,

अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे यांनी मारहाण करुन गच्ची वरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना 13 जून रोजी घडली. याबाबत पिडीत मुलाच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे.

सदर अधिकारी हे आरोपी असून, ही घटना शहराच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे. सदर आरोपींना जबाबदारीच्या पदावरुन तातडीने निलंबीत करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24