महेबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे.

पक्षाच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी कोणत्यातरी विरोधकांने षडयंत्र करून सदरील महिलेला पुढे करून अत्याचार सारख्या गंभीर गुन्हा दाखल करायला लावला आहे.

सदरील महिलेने तिच्यावर ज्यादिवशी अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले त्यादिवशी महेबूब शेख हे मुंबईत होते असे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे तसेच जर काही खोटे असेल तर शेख व सदर महिलेची नार्को टेस्ट करून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली यावरून स्पष्ट होते की विरोधकांकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षड्यंत्र रचण्यात आलेले आहे.

महबूब शेख हे अति सामान्य कुटुंबातून स्वतःच्या कर्तृत्वावर राष्ट्रवादी युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर पोहोचले आहे म्हणून त्यांच्या चांगल्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे काम या महिलेच्या मार्फत करण्यात येत आहे तरी हा खोटा गुन्हा मागे घेऊन या महिलेमागे कोण आहे याचा तपास लावून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केली यावेळी युवकचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग, संतोष आघाव, संगमनेर तालुका अध्यक्ष अक्षय भालेराव, राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे,

ताहेर पटेल, चंद्रकांत मरकड, नितीन धांडे, शरद शिंदे, ऋषिकेश गायकवाड, विक्रम कळमकर, चारुदत्त शिंगर, सचिन पवार, रवी मालुंजकर, धीरज पानसंबळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24