Ahmednagar News: सावेडी उपनगरातील वैष्णव कॉलनी व नरहरी नगर मध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी घुसले.
या परिसरातील नगरसेवकांनी व नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केली की, ओढे-नाल्यांवर मोठ्या प्रमाणात काहींनी अतिक्रमणे केली आहेत.
ही अतिक्रमणे आमदार जगताप यांच्या निदर्शनास आणून दिले. ओढे-नाले गायब करून ड्रेनेज लाईनचे पाईप आणून टाकले आहे.
त्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये घुसत आहे. बुजवलेल्या ओढ्या-नाल्यांचा श्वास मोकळा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी व नगरसेवकांनी आमदार जगताप यांच्याकडे केली आहे.