आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्या सोडविण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षणाच्या कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.

या उपोषणात संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्‍वर भंगड, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल माळी, सुनिल मोरे, सोमनाथ माळी, परसराम माळी, रामू मोरे, लक्ष्मण मोरे, बाजीराव जाधव, सर्जेराव माळी, सखाराम पवार, श्रीकिसन मोरे, आत्माराम गांगर्डे, रघुनाथ बर्डे आदी आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.

आदिवासी भिल्ल समाजा अशिक्षित व मागासलेला असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. हा समाज आपल्या न्याय, हक्कापासून वंचित असून त्यांना न्याय मिळण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांचे प्रश्‍न सोडवूण त्यांना आधार देण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मौजे नेवासा खुर्द (गोरक्षन संस्था) नेवासा येथील अतिक्रमण गायरान जमीन गट नं.35/1 व 35/2 अतिक्रमणाची नोंद तलाठी दप्तर गाव नमुना 1 ई ला व्हावी व अतिक्रमणीत जमीनीत अंग मेहनतीने घेत असलेल्या पिकांची पिक पहाणी करुन 14 नंबरचा फॉर्म भरुन घ्यावा,

तसेच मौजे हंगेवाडी (ता. संगमनेर) येथील गायरान जमीन गट नं. 46, 47 मधील अतिक्रमणित जमीनीची गाव नमुना 1 ई ला नोंद होऊन घरकुलाचा लाभ मिळावा. अंगमेहनतीने कसत असलेल्या गायरान जमीनीची पिक पाहणी करुन 14 नंबरचा फार्म भरुन नोंद करावी, हंगेवाडी येथील गायरान जमीनीत निळवंडे धरण प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी,

अतिक्रमण इत गायरान जमीन व वन जमिनीत घरकुलांचा लाभ मिळावा, आदिवासी कसत असलेल्या गायरान जमिनी, वन जमिनी त्यांच्या नावावर कराव्या, आदिवासी भिल्ल समाजाला खावटी अनुदान कोणत्याही जाचक अटी न लावता सरसकट मिळावे, कोरोनाच्या संकटकाळात आदिवासी बांधवांना लाईट बिल व घरपट्टी 100 टक्के माफ करण्यात यावी,

स्थलांतरित झालेल्या आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्या, घरकुला पासून वंचित असणार्‍या आदिवासी, दलित, भूमिहीनांना नवीन गावठाण निर्माण करून त्यांच्या जागेचा प्रश्‍न सोडवावा, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्डसाठी असलेल्या अटी शिथिल करून ते वेळेवर मिळावेत, विविध शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखल्यांसाठी आदिवासींची अडवणूक त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24