निळवंडे धरणातून पाणी सोडून मध्यमेश्वर बंधारा व पुनतगाव बंधारा भरून द्यावा, अन्यथा गुरुवार (१४ डिसेंबर) पासून उपोषण करण्याचा इशारा नेवासे खुर्द व बुद्रुक, पुनतगाव, खुपटी, चिंचबन, साईनाथनगर ग्रामस्थांनी दिला आहे.
निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की मध्यमेश्वर व पुनतगाव बंधारे भरून देणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
निवेदनावर नंदकुमार पाटील, बाळासाहेब कोकणे, प्रकाश सोनटक्के, राजेंद्र घोरपडे, अनिल बोरकर, अभिजीत मापारी, संभाजीराव काले, संजय गायके, सुनील व्यवहारे, लक्ष्मण जगताप, बाळासाहेब पाटील, प्रकाश वाघ, विशाल सुरडे, संभाजीराव पवार, संदीप बेळे, बाबू घोडेकर, भाऊराव मतकर, मोहन कुटे, अशोक वैद्य, सुरेश घोडेकर आदींच्या सह्या आहेत.