Ahmednagar News : निळवंडे धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आमदार असताना मी निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासे तालुक्यांचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेऊन शासकीय खर्चाने बांधलेले

प्रवरा नदीवरील बंधारे, टाकळीभान, मुठेवाडगाव टेलटॅकसह ओढ्यावरील बंधारे, पाझर तलाव आदीसाठी शासनाच्या पाणी वाटप निर्णयातील तरतुदीनुसार निळवंडे धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करावे, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली.

समन्यायी पाणी वाटप कायदा हा अन्यायकारक आहे. या कायद्यातील तरतुदीमुळे आजची बिकट स्थिती उदभवली आहे. भविष्यात भंडारदरा लाभक्षेत्राचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.

मी आमदार असताना निळवंडे धरण हे बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. पण ती निळवंडेचे लाभधारक असणाऱ्यांच्या राजकीय दबावामुळे मान्य झाली नाही. निळवंडे आपल्या मागणीनुसार बिनकालव्याचे झाले असते, तर आपले भागाला १९.५ टीएमसी पाणी उपलब्ध झाले असते.

सन २००३ मध्ये समन्यायी पाणी वाटप कायद्याचे विधेयक आले, तेव्हा मी आमदार असतो, तर हा कायदा संमत होऊ नये यासाठी प्रयत्न केले असते. नुकतेच निळवंडेचे कालवे कार्यान्वित झाले आहेत.

या धरणाचे पाणी अकोले, संगमनेर व राहाता तालुक्याला मिळणार असल्याने त्यांना लाभ होईल. तर श्रीरामपूर, राहुरी वा नेवासे तालुक्यांचे नुकसान होणार आहे. आजवर आपल्याला भंडारदरा धरणाचे १९ टीएमसी व निळवडेचे ८५ टीएमसी पाणी मिळून १९.५ टीएमसी पाणी मिळत होते.

पण निळवंडेचे कालवे कार्यान्वित झाल्याने निळवंडेचे मिळणारे ८.५ टीएमसी पाणी कमी होणार आहे. निळवंडेच्या पाण्याचा संगमनेर व राहाता तालुक्यांना सर्वाधिक लाभ आहे.

तर श्रीरामपूर तालुक्यातील दिपो या एकमेव गावाला निळवंडेचे पाणी मिळणार असल्याने श्रीरामपूर तालुक्याला निळवंडेचा काहीच फायदा नसून उलट नुकसान होणार आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार भंडारदरा धरणातून २ टीएमसी व निळवंडे धरणातून टीएमसी असे एकूण ३.६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार आहे.

याशिवाय खरिपासाठी वापर झालेल्या पाणीही हिशोबात धरले जाणार आहे. भंडारदऱ्यातून २ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याने आपल्या भागासाठी भंडारदऱ्याचे केवळ ९ टीएमसी पाणी उपलब्ध असणार आहे. पाणी वाटप निर्णयानुसार निळवंडे धरणातील टीएमसी पाणी आरक्षित ठेवावे, अशी मागणी मुरकुटे यांनी केली.

असे आहे भंडरदाराचे तालुकानिहाय पाणी वाटप धोरण

सन १९८९ च्या पाणी वाटप निर्णयानुसार भंडारदरा धरणाचे तालुकानिहाय पाणी वाटप झाले. या वाटपानुसार अकोले (१२ टक्के), संगमनेर (१८ टक्के) राहाता (१६ टक्के), श्रीरामपूर (३६ टक्के), राहुरी (१५ टक्के) व नेवासे (३ टक्के) असे पाणी निर्धारित केले.

ही टक्केवारी ओव्हरफ्लोच्या पाण्यासाठीही लागू आहे. निळवंडे धरण हे ओव्हरफ्लोवर बांधले असल्याने यातील धरण साठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासे तालुक्यांचा निर्धारित टक्केवारीनुसार हक्क आहे.