‘लोकशाही पायदळी तर कारभार हुकूमशाही’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथसर येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात उत्तर प्रदेशात झालेल्या पीडितेच्या अत्याचार प्रकरणात देशभरात संताप व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दोन्ही घटना म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका विरोधक करत आहेत.

या घटनेचा श्रीरामपूर काँग्रेसकडून आ. लहू कानडे व युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली कँडलमार्च काढून निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली.

या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा यासाठी व देशाचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी हे त्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी जात असताना उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करून अटक केली या घटनेचा आम्ही निषेध करतो.

देशात सध्या लोकशाही पायदळी तुडवत हुकूमशाही कारभार चालू असल्याची टीका ससाणे यांनी केली आहे. दरम्यान संगमनेर येथेही सत्यजित तांबे यांनी याविरोधात आंदोलन केले होते. यावेळीही त्यांनी टीका केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24