प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे निदर्शने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा आहे. त्यातून कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही.

अशा अनेक प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण केल्या जात नाही. तसेच शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे जिल्हा कर्मचारी यूनियनच्यावतीने अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी राहाता पंचायत समितीवर नुकतेच निदर्शन केले. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी नागरे यांनी निवेदन स्वीकारले.

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा आहे.

यामुळे त्यांना अनेक आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच आक्रोशाची भावना निर्माण झाली, यामुळे राहाता पंचायत समितीवर कर्मचाऱ्यांच्या वतीने निदर्शन करण्यात आली.

कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभाबरोबरच दरमहा निवृत्तीवेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी यूनियनच्यावतीने निदर्शन करून निवेदन देण्यात आले.

‘ या निदर्शनामध्ये यूनियनचे सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, ज्योती बोराडे, मनीषा जाधव, सुरेखा पाळंदे, नसीमा शेख, ज्योती डहाळे, नंदा दिघे, सुनीता कवडे, वैशाली नाईक, वंदना गमे, प्रतिभा निकाळे,

सरला रहाणे, मंदा वाबळे, शकीला हकीम, संगीता वाघ, रंजना साळुंके, पुष्पलता धनवटे, मंदा दातीर, सुनीता आहेर, आशाबी शेख, कुसूम फाजगे, मीरा सावलके, शीला पिलगर, अर्चना कचवे आदी अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24