स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली प्रवरा पालिकाने मिळविले उत्तुंग यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविले. यात देशातील विविध स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला. 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या लीगमध्ये नगरपालिकेने देशात 15 वा व देशाच्या पश्चिम विभागातील 6 राज्यांमध्ये आठवा क्रमांक मिळविला आहे.

या यशामुळे नगरपालिकेस 5 कोटींचे बक्षीस मिळणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली. यामुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.

शहरात ओला व सुका कच-याचे वर्गीकरण, प्रत्येक प्रभागात घंटागाडी, खतनिर्मिती प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सुलभ शौचालय, रिकाम्या जागेत वृक्षारोपन असे विविध उपक्रम नगरपालिकेने यशस्वीपणे राबविले आहेत.

यासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तालुक्यातील नागरिकांमधून प्रशासन, पदाधिकारी, अधिकारी यांचे कौतुक होत आहे. या निधीमधून आणखी विकास देवळाली प्रवरेचा करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24