‘त्या’ गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तैनात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले.

त्यांतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात अटक करण्यात आलेल्या करीम शेखसह यापूर्वीच्या सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर केले असता

न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींच्या शोधासाठी श्रीरामपूर पोलिसांची दोन पथके जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाठविण्यात आली आहेत.

याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डी. वाय.एसपी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट गुटखा प्रकरणाचा तपास जलदगतीने करीत असून.

आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी पसार आहे. त्यांच्या शोधासाठी काल एक पथक गुजरातला रवाना झाले होते. मात्र ते रिकाम्या हाताने परत आले.

त्यानंतर पुन्हा या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरापींच्या शोधासाठी पोलीस पथक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24