Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमधील राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होईल असे चित्र सध्या दिसून येत असून या ठिकाणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी गाव भेटी तसेच मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला असून दिलेल्या विकासाच्या कामांच्या आधारे ते प्रचार करताना दिसून येत आहेत. त्यांना मिळत असलेल्या पाठिंब्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर राहुरी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी, लहुजी शक्ती सेना,
आरपीआय तसेच फुले, शाहू आणि आंबेडकर चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी देखील आमदार प्राजक्ता तनपुरे यांना मताधिक्य देण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. यावेळी राहुरी परिसरातून मतांचे विभाजन होऊ देणार नसल्याची भूमिका निलेश जगधने यांनी मांडली.
राहुरी परिसरातून मत विभाजन होऊ देणार नाही- निलेश जगधने
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी विधानसभा मतदारसंघातील लहुजी शक्ती सेना, वंचित बहुजन आघाडी तसेच आरपीआय व फुले तसेच शाहू आणि आंबेडकर चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा दिला असून यावेळी त्यांना मताधिक्य देण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केला.
या निवडणुकीत राहुरी परिसरातून मतांचे विभाजन होऊ देणार नसल्याची भूमिका निलेश जगधने यांनी मांडली. पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर चळवळीचे बाळासाहेब जाधव तसेच वंचितचे जिल्हा महासचिव निलेश जगदने,
आरपीआय संघटनेचे बाळासाहेब शिंदे तसेच वंचितचे संपर्कप्रमुख पिंटू नाना साळवे, महिला युवा जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिंग, वंचितच्या जिल्हा उपाध्यक्ष आयनोर पठाण इत्यादी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व या सर्वांनी एकत्रित येत आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना निलेश जगधने, बाळासाहेब जाधव व बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले व म्हटले की आमदार तनपुरे यांच्यासारख्या विकासात्मक चेहऱ्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सगळ्यांनी सांगितले. राहुरी परिसरात कधीही गटतट व पक्ष न पाहता सर्वांच्या भावना जाणून घेत विकास कामे करणारे आमदार तनपुरे यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एकात्मता जोपासली आहे. तसेच जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करत तरुणांना गुन्हेगार बनवण्यात मागील काळात कोणाचे पाठबळ होते? हे देखील राहुरीकरांनी पाहिलेले आहे. सर्वांना सोबत घेऊन राहुरी परिसराचे नंदनवन करण्यासाठी आम्ही पाठिंबाचा निर्णय घेतल्याची पदाधिकाऱ्यांनी सांगितले.