अहमदनगर बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..भविष्यात कर्जतमध्ये एमआयडीसी होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-  कर्जत येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांचे भरभरून कौतुक केले.

सरकार अडचणीत असतानाही कर्जत – जामखेडला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन कोट्यवधीची कामे सुरू करण्यात आली आहेत. येथे केवळ विकासाचेच राजकारण केले जाणार आहे.

यासाठी आम्ही आ. रोहित पवारांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. कर्जत येथे ते बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांनी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी पुढाकार घ्यावा.

तसेच भविष्यात कर्जतमध्ये एमआयडीसी होणार आहे. त्यातून युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले,

आ. रोहित पवार यांच्यासारखा सातत्याने जनतेसाठी धडपड करणारा लोकप्रतिनिधी येथील जनतेला मिळाला आहे हे या मतदारसंघाचे भाग्य आहे. सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन ते मंत्रालयामध्ये घेऊन पाठपुरावा करून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न ते सोडवत आहेत.

Ahmednagarlive24 Office