Ahmednagar News : श्रावण महिना हा खुप महत्वाचा महिना मनाला जातो.त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक भारतीय हिंदू हे हा संपुर्ण महिना उपवास करतात.तसेच बहुतेक हिंदू हे सोमवारी शंकराची तर मंगळवारी देवी पार्वतीची उपासना करतात.
त्यामुळे हिंदू धर्मा मध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे. या महिन्या मध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदित करतात तसेच या सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते.
परंतु या पवित्र महिन्याच्या पूर्वसंध्येला अज्ञात इसमाने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे गणपतीच्या मुर्तीसमोर कोणी तरी अज्ञात इसमाने काळ्या रंगाच्या प्लॅस्टीक पिशवीमध्ये मांसाचे तुकडे ठेवून मुर्तीची विटंबना करून धार्मिक भावना दुखविल्यामुळे काहीकाळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेकडे पोलिसांनी वेळीच लक्ष घातल्याने गावात शांततेचे वातावरण आहे. सदरची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घटना घडली. सकाळी गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अमोल कदम यांच्या लक्षात हा प्रकार आला.
त्यांनी या घटनेची माहिती गावातील प्रमुख नेत्यामंडळीना दिल्याने गावातील नागरिकानी मदिरांकडे धाव घेतली. घटनेची माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने श्रीरामपुरातील हिंदूत्वादी संघटना आक्रमक झाल्याने तालुका पोलीस ठाण्यात कार्यकर्ते जमा झाले.
घटनेचे गांभिर्य ओळखून डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी फौजफाट्यासह गावात दाखल झाले. यावेळी सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले. याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी अमोल कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी गोंडेगाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. भविष्यात अशा विटंबना घटना घडू नये म्हणून गाव बंदची हाक देण्यात आली आहे. गावातील सर्व जातीधर्माचे नागरीक गुण्यागोविंदाने राहत आहे. मात्र असे प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी केली.