अहमदनगर बातम्या

अहमदनगर शहरातील कपिलेश्वर मंदिरात महादेवाच्या मुर्तीची विटंबना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कपिलेश्वर पुरातन शिव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची समाजकंटकांकडून विटंबना केल्याचा कपिलेश्वर मंदिरात महादेवाच्या मुर्तीची विटंबना प्रकार समोर आला आहे.

ही घटना घडताच आ. संग्राम जगताप यांनी मंदिरात जाऊन विधिवत अभिषेक व महाआरती केली. त्यानंतर मॉदराचे विश्वस्त विशाल पवार, राहुल पवार व भाविकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी समाज मंदिराचे विश्वस्त पुजारी यांच्यासह आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, अभिजीत खोसे, प्रा. माणिक विधाते, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मनेष साठे, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, सुमित कुलकर्णी, वैभव वाघ, संतोष लांडे आदी कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.

आ. जगताप म्हणाले की, हिंदू धर्मांमध्ये महादेवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ही घटना खेदजनक आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच समाजकंटकांवर कारवाई केली असती तर अशा घटना घडल्या नसत्या.

समाजकंटकांमुळे समाजा समाजात दरी निर्माण होत असते. शहरात शांतता भंग करण्याचे काम काही समाज कंटक करत असून, पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

विश्वस्त विशाल पवार व राहुल पवार म्हणाले की, पुरातन मंदिर असलेल्या कपिलेश्वर मंदिरातील पिंडीवर ओरखडे ओढल्याचे दिसत आहे. हे ओरखडे धारदार वस्तूने केल्याचा प्रकार आहे. दूध टाकल्यावर हे ओरखडे चांगल्या प्रकारे लक्षात येतात. यात महादेवाच्या पिंडीची विटंबना करण्यात आली आहे.

दिवसभर विधिवत पूजा सुरु आहे, उद्या पिंडीला वज्रलेप लावण्याचे काम सुरु होणार असून, हे काम ८ दिवस सुरु राहणार आहे. याकाळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविक भक्तांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले

Ahmednagarlive24 Office