Parner News : राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून अळकुटी परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून, आगामी वर्षभरात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली.
पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर म्हणाले की, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद गटात पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून,
यापुढेसुद्धा मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागणार आहेत. ना. विखे व खा. विखे पाटील यांनी जिल्हा परिषद गटात विकासकामे देऊन वराळ यांच्या नेतृत्वला पाठबळ दिले आहे.
निघोज – शिरसुले – वडगाव गुंड रसाळवाडी परिसरातील पूल व रस्ता मजबुतीकरण कामांचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्या रुपाली गायखे व पोपटराव कळमोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला, या वेळी वराळ बोलत होते.
या वेळी पं. स. सदस्य दिनेश बाबर तंटामुक्तीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, ग्रा.पं. सदस्या इंदूबाई घोगरे, माजी सदस्या मिराबाई घोगरे, अस्लमभाई इनामदार, पत्रकार ठकाराम गायखे, दत्ता घोगरे, नारायण घोगरे, शिवाजीराव डेरे,सुनील घोगरे, बाळू चौधरी, विशाल डेरे, किसनराव घोगरे, कचर डेरे,दिलीप लंके, सुहास लंके,
विजय गुंड, गणेश लंके, माऊली लंके, किसन साहेब घोगरे, आप्पासाहेब घोगरे, बाबाजी घोगरे, शहाजी घोगरे, शिवाजी जेडगुले, बाळू दगडू घोगरे, रामेश्वर घोगरे, निलेश घोगरे, विनायक डेरे, दिगंबर घोगरे, यादव घोगरे, संपत घोगरे, रमेशघोगरे, भैरु घोगरे, महादेव घोगरे,
भास्कर जगदाळे, मेजर उत्तम घोगरे, दत्तू मंडले, अंकुश घोगरे, लहू घोगरे, ज्ञानदेव घोगरे, योगेश घोगरे, दादाभाऊ जगताप, दिपक लंके, गंगाराम भिकाजी घोगरे, अमर घोगरे, रवि लंके, संतोष शेटे, ठेकेदार आमिर शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.