अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजीमंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेऊन तब्येतीबाबत विचारपूस केली.
यावेळी आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते,
आता त्यांची तब्येत ठणठणीत असून ते वरळी येथील निवासस्थानी आराम करत आहेत. काल सकाळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत ही भेट महत्वाची समजली जाते.
नगर येथे माजी आमदार कर्डिले, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली. माजी आ. वैभव पिचड यावेळी उपस्थित होते.