अजमेरच्या सुफी संतबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या देवगनचा निषेध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  अजमेर येथील सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या बद्दल अमिश देवगन याने अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

तर देवगनवर गुन्हे दाखल करुन सदर प्रकार प्रेक्षेपण करणार्‍या वृत्त वाहिनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले.

यावेळी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक शहराध्यक्ष पवन भिंगारदिवे आदि उपस्थित होते.

मुस्लिम समाजासह विविध धर्मातील भाविक अजमेर येथील सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गाला दर्शनास जातात. सर्व धर्मिय ऐक्याचे प्रतिक म्हणून हे धार्मिक स्थळ भारतात सुपरिचित आहे.

एका वृत्त वाहिनीचे निवेदन अमिश देवगन यांनी हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या बद्दल चुकीचे विधान केले. हा प्रकार संपुर्ण भारतात प्रसारित करण्यात आला.

यामुळे मुस्लिम समाजासह सर्व भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी तातडीने अमिश देवगन याच्यावर कायदेशीर कारवाई करुन वृत्त वाहिनीवर बंदी टाकण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24