सोनई : घोडेगाव येथील जागृत देवस्थान घोडेश्वरी देवी यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहात संपन्न होत असते.
परंतु घोडेश्वरी देवी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्व विधी,पूजाअर्चा तसेच आत्ताची चैत्र यात्रा देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच भाविकांशिवाय पार पडली. पोलीस बांधवांनी देवीच्या पालखीला खांदा दिला.
चैत्र पंचमी तिथीला व १२ एप्रिल या तारखेला घोडेश्वरी यात्रा उत्सव सोहळा होता. परंतु कित्येक वर्षांची यात्रा पालखीची परंपरा यावर्षी प्रशासनामार्फत पार पाडण्यात आली. भारतभर कोरोना व्हायरसचे सावट आहे.
या धोरणानुसार लॉकडाउन व संचारबंदी चालू आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घोडेश्वरी मंदिरही बंद करण्यात आलेले आहे.
यंदा ही यात्राही भरू शकलेली नाही. घोडेगाव परिसर पूर्णपणे शांत व रस्ते सुनेसुने झालेले आहेत. घोडेगाव घोडेश्वरी यात्रा कमिटी असली तरी यंदा मात्र देवीची विधिवत पूजा पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.
सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव बीटचे पोलीस नाईक किरण कुमार, गायकवाड कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात यांनी देवी पालखीची तेथेच मिरवणूक काढली.
या पालखी मिरवणूक विधी प्रसंगी होमगार्ड कराळे, रस्ते सुरक्षा विभागाचे मदतनीस सिकंदर शेख हेच मर्यादित शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®