धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळा मधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध एका महिलेने ब्लॅकमेल करणे, अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाहीये.

तसेच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामाही दिला नाहीये. याच्या निषेधार्थ नगर शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधीकारींना निवेदन देण्यात आले.

महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा अंजली वल्लाकटी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश सचिव सुरेखा विद्दे, गीता गिल्डा, वंदना पंडित, छावणी परिषदेच्या सदस्या शुभांगी साठे, भिंगार महिला अध्यक्षा जोत्सना मुंगी, केडगाव महिला अध्यक्षा संध्या पावसे, संगीता मुळे आदी उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना अंजली वल्लाकटी म्हणाल्या, महाआघाडी सरकार मधील जवाबदार मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अत्याचार केले आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिलेला नाहीये.

महिला भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून त्यांचा त्वरित राजीनामा घेतला नाहीतर महिला पदाधिकारिंनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होते.

त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले आहे. महिलेवर अत्याचार करणारे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाहीये.

अहमदनगर लाईव्ह 24