धूम स्टाईलने महिलेचे गंठण लांबवीले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात चोऱ्यांचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. त्यातच लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

दरदिवशी या वाढत्या घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणा देखील साफ अयशस्वी ठरत आहे. नुकतेच शहरात एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे गंठण ओरबडून नेल्याची घटना लिंक रोडवर घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात तिघां भामट्यांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदुरा रोहित कुलकर्णी (वय- 30 रा. बालिकाश्रम रोड, नगर) यांनी फिर्यादी दिली आहे.

फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून लिंक रोडने बालिकाश्रम रोड येथील घरी येत असताना लिंक रोडवरील राहुल शिंदे यांच्या घरासमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण ओरबडून पोबारा केला.

घटनास्थळी उपअधीक्षक अजित पाटील, निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस नाईक शिरसाठ करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24