धूम स्टाईलने पैशाची बॅग पळवली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच धूम स्टाईलने चोरी करून क्षणात फरार होण्याचा ट्रेंड चोरट्यांमध्ये रुजू लागला आहे. असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे.

राहुरी तालुक्यातल्या टाकळिमियाँ रस्त्याच्या विजेच्या गोडावूनजवळ दुचाकीवरून पैशांचा भरणा करण्यासाठी जात असताना बजाज कंपनीच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ३ लाख रुपये असलेली पैशांची बॅग हिसकावून धूम ठोकली.

यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यातल्या एकाने मारहाण केली आणि मोटरसायकलवरून राहुरीकडे पलायन केले.

याप्रकरणी स्वप्निल धंनजय झोडे {ऑपरेटर, राईटर सेफ गार्ड प्रायव्हेट लिमिटेड, रा. गणेगाव फाटा, शिवनेरी हॉटेलशेजारी, राहुरी फॅक्टरी, राहुरी.} यांनी फिर्याद दिली.

त्यांच्या या फिर्यादीनुसार राहुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे पुढील तपास करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24