अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- अकोले शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. तसेच शेतकरी सध्या पिकांची काढणीच्या कामाला लागला आहे.
सोयाबीन सह अन्य पिकांची काढणी सुरू असतांनाच पावसास सुरुवात झाली.या जोरदार पावसाने शेतकर्यांची खूपच धावपळ उडाली. तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. वाहतुकीची कोंडी झाली होती. तर बुधवारी सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.
यामुळेअकोले-संगमनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहन चालकांची वाहने चालवितांना तारांबळ पहावयास मिळाली. अकोले शहरातील परखतपूर,कारखाना,संगमनेर कडे जाणार्या रस्त्यांवर पाणीच पाणी वाहू लागले.
अनेक व्यापार्यांच्या तळ मजल्यात पाणी शिरले,त्यामुळे अनेकांच्या मालाची नुकसान झाली. अकोले शहरात या पावसाळ्यातील सर्वात जोरदार पाऊस काल पडला. त्यामुळे अनेक शेतकरी व व्यापार्यांचे नुकसान झाले.